भीती ही भावना नसून अनेकांच्या आयुष्याला लागलेला रोग आहे.
आयुष्य कठीण आहे पण तक्रारी करून ते सोपं होणार नाही, म्हणून प्रयत्न करत राहा.
जर तुम्हाला आयुष्यामध्ये खूप संघर्ष करावा लागत असेल, तर स्वत:ला खूप नशीबवान समजा कारण देव संघर्ष करायची संधी फक्त त्यांनाच देतो, ज्यांच्यामध्ये क्षमता असते.
आपला वेळ मर्यादित आहे, तो दुसऱ्याचे आयुष्य जगण्यात वाया घालवू नका.
आयुष्यात समोर आलेली आव्हाने जरूर स्वीकारा, कारण त्यातुन तुम्हाला एक तर विजय मिळेल, किंवा पराजयातुन अनुभव मिळेल.
स्वतः ला दिवसेंदिवस अपडेट करणे हाच तर आयुष्य जगण्याचा खरा नियम आहे.
नोकर तर आयुष्यात कधीपण होऊ शकता, मालक व्हायची स्वप्न बघा.
क्षेत्र कोणतेही असो, आयुष्यात कष्टाला पर्याय नाही आणि कष्ट प्रामाणिक असले की, यशालाही पर्याय नाही.
कधी कधी काही चुकीची माणसं आयुष्याचा खरा अर्थ समजून देतात.
आयुष्यातील सर्वात मोठा आनंद म्हणजे, जे तुम्हाला जमणार नाही, असं लोकांना वाटतं, ते साध्य करून दाखवणं.