राजासारखे आयुष्य जगण्यासाठी गुलामासारखी मेहनत सुद्धा करावी लागते.
आयुष्यातील अडचणी आपल्याला त्रास देण्यासाठी येत नाहीत, तर आपल्यात लपलेल्या क्षमतेची जाणीव करून देण्यासाठी येतात.
जर तुम्हाला आयुष्यामध्ये खूप संघर्ष करावा लागत असेल, तर स्वत:ला खूप नशीबवान समजा कारण देव संघर्ष करायची संधी फक्त त्यांनाच देतो, ज्यांच्यामध्ये क्षमता असते.
कधी कधी काही चुकीची माणसं आयुष्याचा खरा अर्थ समजून देतात.
भीती ही भावना नसून अनेकांच्या आयुष्याला लागलेला रोग आहे.
जर आयुष्यात काही मिळवायचं असेल तर पद्धती बदला, ध्येय नाही.
जो व्यक्ती लवकर जबाबदारी घ्यायला शिकतो त्या व्यक्तीला आयुष्यात कितीही संकट येत राहिले तर तो मागे फिरत नाही.
संयम राखणे हा आयुष्यातला फार मोठा गुण आहे.
आयुष्यातील प्रत्येक क्षण हा अमूल्य आहे, तो आनंदाने जगा आणि प्रत्येक हृदय जिंकत रहा.
ज्याने पावलोपावली आयुष्यात दुःख भोगलंय, तोच नेहमी इतरांना हसवू शकतो, कारण हसण्याची किंमत त्याच्याइतकी कोणालाच ठाऊक नसते.