आयुष्यातल्या कोणत्याही क्षणी क्रोधाचे गुलाम बनू नका.
आयुष्यात अश्रूंशी संघर्ष केल्यानंतर चेहऱ्यावर उमटलेल्या हास्याइतके सुंदर काहीच नसते.
एक साधा विचारसुध्दा तुमचं आयुष्य उजळवू शकतो, म्हणून नेहमी नवे विचार मिळवत रहा.
ज्या माणसाकडे चांगल्या विचारांचा भक्कम पाया नाही, त्याची आयुष्याची इमारत उभीच राहू शकत नाही.
आयुष्यातील प्रत्येक क्षण हा अमूल्य आहे, तो आनंदाने जगा आणि प्रत्येक हृदय जिंकत रहा.
आयुष्यात नशीबाचा भाग फक्त एक टक्का आणि परिश्रमाचा भाग नव्याण्णव टक्के असतो.
आयुष्य जगून समजते, केवळ ऐकून, वाचून, बघून समजत नाही.
आयुष्य कठीण आहे पण तक्रारी करून ते सोपं होणार नाही, म्हणून प्रयत्न करत राहा.
कधी कधी काही चुकीची माणसं आयुष्याचा खरा अर्थ समजून देतात.
जर तुम्हाला आयुष्यामध्ये खूप संघर्ष करावा लागत असेल, तर स्वत:ला खूप नशीबवान समजा कारण देव संघर्ष करायची संधी फक्त त्यांनाच देतो, ज्यांच्यामध्ये क्षमता असते.