एक साधा विचारसुध्दा तुमचं आयुष्य उजळवू शकतो, म्हणून नेहमी नवे विचार मिळवत रहा.
आयुष्यात नशीबाचा भाग फक्त एक टक्का आणि परिश्रमाचा भाग नव्याण्णव टक्के असतो.
तुमचा आजचा संघर्ष तुमचे उद्याचे सामर्थ निर्माण करतो, त्यामुळे विचार बदला म्हणजे तुमचे आयुष्य बदलेल.
आयुष्यात समोर आलेली आव्हाने जरूर स्वीकारा, कारण त्यातुन तुम्हाला एक तर विजय मिळेल, किंवा पराजयातुन अनुभव मिळेल.
आयुष्यातील प्रत्येक क्षण हा अमूल्य आहे, तो आनंदाने जगा आणि प्रत्येक हृदय जिंकत रहा.
जर तुम्हाला आयुष्यामध्ये खूप संघर्ष करावा लागत असेल, तर स्वत:ला खूप नशीबवान समजा कारण देव संघर्ष करायची संधी फक्त त्यांनाच देतो, ज्यांच्यामध्ये क्षमता असते.
आयुष्यात सुखी व्हायचे असेल तर जगाचा विचार करणे सोडून द्या.
आयुष्यातील अडचणी आपल्याला त्रास देण्यासाठी येत नाहीत, तर आपल्यात लपलेल्या क्षमतेची जाणीव करून देण्यासाठी येतात.
संयम राखणे हा आयुष्यातला फार मोठा गुण आहे.
स्वप्न मोफतच असतात, फक्त त्यांचा पाठलाग करतांना आयुष्यात बरीच किंमत मोजावी लागते.