खेळ पत्त्यांचा असो किंवा आयुष्याचा, तुमचा एक्का तेव्हाच दाखवा जेव्हा समोर बादशाह असेल.
कधी कधी काही चुकीची माणसं आयुष्याचा खरा अर्थ समजून देतात.
जर तुम्हाला आयुष्यामध्ये खूप संघर्ष करावा लागत असेल, तर स्वत:ला खूप नशीबवान समजा कारण देव संघर्ष करायची संधी फक्त त्यांनाच देतो, ज्यांच्यामध्ये क्षमता असते.
आयुष्य जर तुम्हाला मागे खेचत असेल तर तुम्ही नक्की पुढे जाणार आहात, कारण धनुष्यबाण लांब जाण्यासाठी आधी मागे खेचावा लागतो.
माणसाच्या आयुष्याचे रहस्य केवळ जगण्यात नसून कशासाठीतरी जगण्यात आहे.
आयुष्यात आनंदाने जगायचे असेल तर दोनच गोष्टी विसरा, तुम्ही इतरांसाठी जे चांगले केले ते व इतरांनी तुमच्याशी वाईट केले ते.
आयुष्यामध्ये नेहमी कमी लोकांनी तुडवलेली वाट निवडा, कमी वेळात यशस्वी व्हाल.
माणसाच्या आयुष्यातील संकटे ही यशाचा आनंद घेण्यासाठी आवश्यक आहेत.
आजचा संघर्ष उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो, विचार बदला आयुष्य बदलेल.
नोकर तर आयुष्यात कधीपण होऊ शकता, मालक व्हायची स्वप्न बघा.