वसंताची पहाट घेऊन आली,
नवचैतन्याचा गोडवा,
समृद्धीची गुढी उभारू,
आला चैत्र पाडवा.
गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
गुढी उभारू आनंदाची, समृद्धीची, आरोग्याची,
समाधानाची आणि उत्तुंग यशाची.
गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
उभारून आनंदाची गुढी दारी,
जीवनात येवो रंगात न्यारी,
पूर्ण होवोत आपल्या सर्व इच्छा-आकांशा,
नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.
गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
नेसून साडी माळून गजरा उभी राहिली गुढी,
नव वर्षाच्या स्वागताची ही तर पारंपारिक रूढी,
रचल्या रांगोळ्या दारोदारी नटले सारे अंगण,
प्रफुल्लीत होवो तुमचे जीवन सुगंधीत जसे चंदन.
गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
येवो समृद्धी अंगणी,
वाढो आनंद जीवनी,
तुम्हासाठी या शुभेच्छा,
नववर्षाच्या या शुभदिनी.
गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
हर्ष नवा वर्ष नवा
चैतन्याचा उत्साह नवा,
संकल्प नवा उल्हास नवा
मराठी वर्षाचा सण हा नवा.
गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
गुढी उभारून आकाशी,
बांधून तोरण दाराशी,
काढून रांगोळी अंगणी,
हर्ष पेरुनी मनोमनी,
करू सुरुवात नव वर्षाची.
गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
गुढी उभारूया नव्या सुरुवातीची
नव्या उमेदीची नव्या नवलाईची
तोरण सजवून तयारी स्वागताची
नव्या वर्षाला या नव्या ध्येयाची
बांधूया बंधन गुढी नव्या शब्दांची.
गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
नक्षीदार काठीवरी रेशमी वस्त्र,
त्याच्यावर चांदीचा लोटा,
उभारुनी मराठी मनाची गुढी,
साजरा करूया हा गुढीपाडवा.
गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
वसंत ऋतूच्या आगमनी
कोकिळा गायी मंजुळ गाणी,
नव वर्ष आज शुभ दिनी
सुख समृद्धी नांदो जीवनी.
मंद वारा वसंताची चाहूल घेऊन आला,
पालवी मधल्या प्रत्येक पानात नवंपण देऊन गेला,
त्याने नवीन वर्षाची सुरुवात ही अशीच केली
नाविन्याच्या आनंदासाठी तो मंगल गुढी घेऊन आला.
गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
चैत्राची सुरुवात झाली
साखरेच्या गाठीला आला गोडवा,
यशाची गुढी उभारून
सर्वांना आनंदात जावो हा गुढीपाडवा.
गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
सुरु होत आहे नवीन वर्ष
मनात असू द्या नेहमी हर्ष,
येणारा नवीन दिवस करेल
नव्या विचारांना स्पर्श.
गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
वसंताची चाहूल घेऊन येते नववर्ष,
सर्वांच्या मनात या निमित्ताने पुन्हा होऊ दे हर्ष.
गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
गुढी आपल्या नात्याची गुढी आहे विश्वासाची,
गुढी आहे संस्कृतिची गुढी आहे जिव्हाळ्याची,
गुढी आहे आपलेपणाच्या आपुलकीची,
गुढी आहे सर्वस्व असलेल्या आपल्या नात्याची.