उत्सव रंगांचा पण रंगाचा बेरंग करू नका,
वृक्ष तोडून होळी साजरी करू नका,
नैसर्गिक रंगांचाच वापर करा,
प्राण्यांना रंग लावून त्रास देऊ नका,
रंगांनी भरलेले फुगे मारून
कोणाला ईजा करू नका.
होळीच्या हार्दिक शुभेच्छा!
क्षणभर बाजूला सारूया
रोजच्या वापरातले विटके क्षण,
गुलाल, रंग उधळूया
रंगूया होळीच्या नशेत विलक्षण.
होळीच्या हार्दिक शुभेच्छा!
आला रंगांचा सण
मौज मस्ती धुमशान,
आज घराघरात पुरण पोळी रे
आज वर्षाची होळी आली रे.
होळीच्या हार्दिक शुभेच्छा!
वसंत ऋतू फुलला आज सजनीच्या मनी,
रंगांची उधळण तिच्यावर सजणाच्या अंगणी,
प्रीतीची वेल फुलली गातो आम्ही गाणी,
चिंब भिजू दे आज रंगपंचमीची राणी.
होळीच्या हार्दिक शुभेच्छा!
पाणी जपुनिया
घेऊ पर्यावरण समृद्धीचा वसा,
होळी खेळण्यास
प्रेमाचा एक रंगच पुरेसा.
होळीच्या हार्दिक शुभेच्छा!
चला, आज पेटवूया होळी
नैराश्याची बांधून मोळी,
दाखवून नैवद्य पुरणाची पोळी
करू आनंदाने साजरी होळी.
होळीच्या हार्दिक शुभेच्छा!
होळी पेटू दे, रंग उधळू दे, द्वेष जळू दे,
अवघ्या जीवनात नवे रंग भरू दे.
होळीच्या हार्दिक शुभेच्छा!
मत्सर, द्वेष, मतभेद विसरू
प्रेम, शांती, आनंद चहुकडे पसरू,
अग्नित होळीच्या नकारात्मकता जाळू रे,
आली होळी आली रे.
होळीच्या हार्दिक शुभेच्छा!
रंग साठले मनी अंतरी
उधळू त्यांना नभी चला
आला आला रंगोत्सव हा आला.
होळीच्या हार्दिक शुभेच्छा!
फाल्गुन मासी येते होळी
खायला मिळते पुरणाची पोळी,
रात्री देतात जोरात आरोळी
राख लावतो आपुल्या कपाळी.