फाल्गुण पौर्णिमेच्या रात्री पेटवू
नकारात्मकतेची होळी,
आनंदाने भरो आपली झोळी
साजरी करुया रंगबेरंगी होळी.
होळीच्या हार्दिक शुभेच्छा!
न जाणता जात नि भाषा उधळूया रंग,
चढू दे प्रेमाची नशा
मैत्री अन् नात्यांचे भरलेले तळे
भिजुनी फुलवूया प्रेम रंगाचे मळे.
होळीच्या हार्दिक शुभेच्छा!
उत्सव रंगांचा पण रंगाचा बेरंग करू नका,
वृक्ष तोडून होळी साजरी करू नका,
नैसर्गिक रंगांचाच वापर करा,
प्राण्यांना रंग लावून त्रास देऊ नका,
रंगांनी भरलेले फुगे मारून
कोणाला ईजा करू नका.
होळीच्या हार्दिक शुभेच्छा!
रंगून जाऊ रंगात आता,
अखंड उठु दे मनी तरंग,
तोडून सारे बंध सारे,
असे उधळुया आज हे रंग.
होळीच्या हार्दिक शुभेच्छा!
फाल्गुन मासी येते होळी
खायला मिळते पुरणाची पोळी,
रात्री देतात जोरात आरोळी
राख लावतो आपुल्या कपाळी.
होळीच्या हार्दिक शुभेच्छा!
होळी दरवर्षी येते आणि
सर्वांना रंगवून जाते,
ते रंग निघून जातात पण,
तुमच्या प्रेमाचा रंग तसाच राहतो.
होळीच्या हार्दिक शुभेच्छा!
रंग प्रेमाचा, रंग स्नेहाचा,
रंग नात्यांचा, रंग बंधाचा,
रंग हर्षाचा, रंग उल्हासचा,
रंग नव्या उत्सवाचा,
साजरा करू होळी संगे.