रंगून जाऊ रंगात आता,
अखंड उठु दे मनी तरंग,
तोडून सारे बंध सारे,
असे उधळुया आज हे रंग.
होळीच्या हार्दिक शुभेच्छा!
चला, आज पेटवूया होळी
नैराश्याची बांधून मोळी,
दाखवून नैवद्य पुरणाची पोळी
करू आनंदाने साजरी होळी.
होळीच्या हार्दिक शुभेच्छा!
सुखाच्या रंगांनी आपले
जीवन रंगीबेरंगी होवो,
होळीच्या ज्वाळेत वाईटाचा
समूळ नायनाट होवो.
होळीच्या हार्दिक शुभेच्छा!
आली होळी, आली होळी,
नवरंगांची घेऊन खेळी,
तारुण्याची अफाट उसळी,
रंगी रंगू सर्वांनी.
होळीच्या हार्दिक शुभेच्छा!
रंग साठले मनी अंतरी
उधळू त्यांना नभी चला
आला आला रंगोत्सव हा आला.
होळीच्या हार्दिक शुभेच्छा!
उत्सव रंगांचा पण रंगाचा बेरंग करू नका,
वृक्ष तोडून होळी साजरी करू नका,
नैसर्गिक रंगांचाच वापर करा,
प्राण्यांना रंग लावून त्रास देऊ नका,
रंगांनी भरलेले फुगे मारून
कोणाला ईजा करू नका.
होळीच्या हार्दिक शुभेच्छा!
होळीच्या पवित्र अग्निमध्ये
निराशा, दारिद्र्य, आळस यांचे दहन होवो,
अणि सर्वांच्या आयुष्यात आनंद, सुख
आरोग्य अणि शांति नांदो.
होळीच्या हार्दिक शुभेच्छा!
पाणी जपुनिया
घेऊ पर्यावरण समृद्धीचा वसा,
होळी खेळण्यास
प्रेमाचा एक रंगच पुरेसा.
होळीच्या हार्दिक शुभेच्छा!
होळी पेटता उठल्या ज्वाळा,
दुष्ट वृत्तीचा अंत हा झाला,
रंगाचा सण हा आला,
आनंद, सुख शांती लाभो तुम्हाला.
होळीच्या हार्दिक शुभेच्छा!
होळी पेटू दे, रंग उधळू दे, द्वेष जळू दे,
अवघ्या जीवनात नवे रंग भरू दे.