उत्सव रंगांचा पण रंगाचा बेरंग करू नका,
वृक्ष तोडून होळी साजरी करू नका,
नैसर्गिक रंगांचाच वापर करा,
प्राण्यांना रंग लावून त्रास देऊ नका,
रंगांनी भरलेले फुगे मारून
कोणाला ईजा करू नका.
होळीच्या हार्दिक शुभेच्छा!
भिजू दे रंग आणि अंग स्वच्छंद,
अखंड उडू दे मनि रंगतरंग,
व्हावे अवघे जीवन दंग
असे उधळू आज हे रंग.
होळीच्या हार्दिक शुभेच्छा!
थंड रंगस्पर्श मनी नवहर्ष,
अखंड रंगबंध जगी सर्वधुंद.
होळीच्या हार्दिक शुभेच्छा!
मत्सर, द्वेष, मतभेद विसरू
प्रेम, शांती, आनंद चहुकडे पसरू,
अग्नित होळीच्या नकारात्मकता जाळू रे,
आली होळी आली रे.
होळीच्या हार्दिक शुभेच्छा!
रंग प्रेमाचा, रंग स्नेहाचा,
रंग नात्यांचा, रंग बंधाचा,
रंग हर्षाचा, रंग उल्हासचा,
रंग नव्या उत्सवाचा,
साजरा करू होळी संगे.
होळीच्या हार्दिक शुभेच्छा!
आला रंगांचा सण
मौज मस्ती धुमशान,
आज घराघरात पुरण पोळी रे
आज वर्षाची होळी आली रे.