आली होळी, आली होळी,
नवरंगांची घेऊन खेळी,
तारुण्याची अफाट उसळी,
रंगी रंगू सर्वांनी.
होळीच्या हार्दिक शुभेच्छा!
पाणी जपुनिया
घेऊ पर्यावरण समृद्धीचा वसा,
होळी खेळण्यास
प्रेमाचा एक रंगच पुरेसा.
होळीच्या हार्दिक शुभेच्छा!
क्षणभर बाजूला सारूया
रोजच्या वापरातले विटके क्षण,
गुलाल, रंग उधळूया
रंगूया होळीच्या नशेत विलक्षण.
होळीच्या हार्दिक शुभेच्छा!
फाल्गुन मासी येते होळी
खायला मिळते पुरणाची पोळी,
रात्री देतात जोरात आरोळी
राख लावतो आपुल्या कपाळी.
होळीच्या हार्दिक शुभेच्छा!
भिजू दे रंग आणि अंग स्वच्छंद,
अखंड उडू दे मनि रंगतरंग,
व्हावे अवघे जीवन दंग
असे उधळू आज हे रंग.
होळीच्या हार्दिक शुभेच्छा!
होळी पेटू दे, रंग उधळू दे, द्वेष जळू दे,
अवघ्या जीवनात नवे रंग भरू दे.
होळीच्या हार्दिक शुभेच्छा!
नारिंगी रंग पळसाच्या फुलांचा
हिरवा, गुलाबी, गुलालाचा,
पिचकारीत भरून सारे रंग
रंगवूया एकमेकांना.
होळीच्या हार्दिक शुभेच्छा!
उत्सव रंगांचा पण रंगाचा बेरंग करू नका,
वृक्ष तोडून होळी साजरी करू नका,
नैसर्गिक रंगांचाच वापर करा,
प्राण्यांना रंग लावून त्रास देऊ नका,
रंगांनी भरलेले फुगे मारून
कोणाला ईजा करू नका.
होळीच्या हार्दिक शुभेच्छा!
रंग प्रेमाचा, रंग स्नेहाचा,
रंग नात्यांचा, रंग बंधाचा,
रंग हर्षाचा, रंग उल्हासचा,
रंग नव्या उत्सवाचा,
साजरा करू होळी संगे.
होळीच्या हार्दिक शुभेच्छा!
आनंद होवो Overflow
मौजमजा कधी न होवो Low,
तुमची होळी साजरी होवो एकदम नंबर One
आणि तुम्ही संपूर्ण आयुष्य करा Lots of Fun.