भेदभाव हे विसरून सारे
दुःप्रवृत्तीचा अंत करा रे,
जगण्यात या रंग भरा रे
हेच होळी गीत गात रहा रे.
होळीच्या हार्दिक शुभेच्छा!
खमंग पुरणपोळीचा आस्वाद घेण्याआधी,
रंगामध्ये रंगून जाण्याआधी,
होळीच्या धुरामध्ये हरवून जाण्याआधी,
पौर्णिमेचा चंद्र उगवण्याआधी,
तुम्हाला मी व माझ्या परिवारातर्फे,
होळीच्या हार्दिक शुभेच्छा!
होळीच्या हार्दिक शुभेच्छा!
मत्सर, द्वेष, मतभेद विसरू
प्रेम, शांती, आनंद चहुकडे पसरू,
अग्नित होळीच्या नकारात्मकता जाळू रे,
आली होळी आली रे.
होळीच्या हार्दिक शुभेच्छा!
आला रंगांचा सण
मौज मस्ती धुमशान,
आज घराघरात पुरण पोळी रे
आज वर्षाची होळी आली रे.
होळीच्या हार्दिक शुभेच्छा!
सुखाच्या रंगांनी आपले
जीवन रंगीबेरंगी होवो,
होळीच्या ज्वाळेत वाईटाचा
समूळ नायनाट होवो.
होळीच्या हार्दिक शुभेच्छा!
उत्सव रंगांचा पण रंगाचा बेरंग करू नका,
वृक्ष तोडून होळी साजरी करू नका,
नैसर्गिक रंगांचाच वापर करा,
प्राण्यांना रंग लावून त्रास देऊ नका,
रंगांनी भरलेले फुगे मारून
कोणाला ईजा करू नका.
होळीच्या हार्दिक शुभेच्छा!
पिचकारीचे पाणी अन रंगाची गाणी,
रंगपंचमीच्या सणाची अशी अनोखी कहाणी,
विभिन्न रंगानी रंगलेल्या हा सोहळा,
लहान मोठ्याचा उत्साह कसा जगावेगळा.
होळीच्या हार्दिक शुभेच्छा!
होळीच्या पवित्र अग्निमध्ये
निराशा, दारिद्र्य, आळस यांचे दहन होवो,
अणि सर्वांच्या आयुष्यात आनंद, सुख
आरोग्य अणि शांति नांदो.