मत्सर, द्वेष, मतभेद विसरू
प्रेम, शांती, आनंद चहुकडे पसरू,
अग्नित होळीच्या नकारात्मकता जाळू रे,
आली होळी आली रे.
होळीच्या हार्दिक शुभेच्छा!
होळी, रंगपंचमीचा सण रंगांचा
आगळ्यावेगळ्या ढंगाचा,
वर्षाव करी आनंदाचा.
होळीच्या हार्दिक शुभेच्छा!
नवयुग होळीचा संदेश नवा
झाडे लावा, झाडे जगवा,
करूया अग्निदेवतेची पूजा
होळी गोवऱ्यानी सजवा.
होळीच्या हार्दिक शुभेच्छा!
उत्सव रंगांचा पण रंगाचा बेरंग करू नका,
वृक्ष तोडून होळी साजरी करू नका,
नैसर्गिक रंगांचाच वापर करा,
प्राण्यांना रंग लावून त्रास देऊ नका,
रंगांनी भरलेले फुगे मारून
कोणाला ईजा करू नका.
होळीच्या हार्दिक शुभेच्छा!
रंग साठले मनी अंतरी
उधळू त्यांना नभी चला
आला आला रंगोत्सव हा आला.
होळीच्या हार्दिक शुभेच्छा!
होळीच्या पवित्र अग्निमध्ये
निराशा, दारिद्र्य, आळस यांचे दहन होवो,
अणि सर्वांच्या आयुष्यात आनंद, सुख
आरोग्य अणि शांति नांदो.
होळीच्या हार्दिक शुभेच्छा!
सुखाच्या रंगांनी आपले
जीवन रंगीबेरंगी होवो,
होळीच्या ज्वाळेत वाईटाचा
समूळ नायनाट होवो.
होळीच्या हार्दिक शुभेच्छा!
भिजू दे रंग आणि अंग स्वच्छंद
अखंड उडू दे मनी रंगतरंग,
व्हावे अवघे जीवन दंग
असे उधळू आज हे रंग.
होळीच्या हार्दिक शुभेच्छा!
होळी पेटता उठल्या ज्वाळा,
दुष्ट वृत्तीचा अंत हा झाला,
रंगाचा सण हा आला,
आनंद, सुख शांती लाभो तुम्हाला.
होळीच्या हार्दिक शुभेच्छा!
रंगात किती मिसळती रंग
जन उल्हासित होती दंग,
होवो दुष्कृत्याचा भंग
होळी ठेवो देश एकसंग.