Happy Holi 2023 Wishes Images in Marathi - होळीच्या शुभेच्छा
Share :
आला रंगांचा सण
मौज मस्ती धुमशान,
आज घराघरात पुरण पोळी रे
आज वर्षाची होळी आली रे.
होळीच्या हार्दिक शुभेच्छा!
भेदभाव हे विसरून सारे
दुःप्रवृत्तीचा अंत करा रे,
जगण्यात या रंग भरा रे
हेच होळी गीत गात रहा रे.
होळीच्या हार्दिक शुभेच्छा!
इंद्रधनुच्या रंगांसोबत तुम्हाला
पाठवल्या आहेत शुभेच्छा,
तुमच्यावर प्रेम, आनंद आणि
उल्हासाचा होवो वर्षाव.
होळीच्या हार्दिक शुभेच्छा!
होळी, रंगपंचमीचा सण रंगांचा
आगळ्यावेगळ्या ढंगाचा,
वर्षाव करी आनंदाचा.
होळीच्या हार्दिक शुभेच्छा!
न जाणता जात नि भाषा उधळूया रंग,
चढू दे प्रेमाची नशा
मैत्री अन् नात्यांचे भरलेले तळे
भिजुनी फुलवूया प्रेम रंगाचे मळे.
होळीच्या हार्दिक शुभेच्छा!
रंगबिरंगी रंगाचा सण हा आला
होळी पेटता उठ ल्या ज्वाला,
दृष्टवृत्तीचा अंत हा झाला
सण आनंदे साजरा केला.
होळीच्या हार्दिक शुभेच्छा!
रंग प्रेमाचा, रंग स्नेहाचा,
रंग नात्यांचा, रंग बंधाचा,
रंग हर्षाचा, रंग उल्हासचा,
रंग नव्या उत्सवाचा,
साजरा करू होळी संगे.
होळीच्या हार्दिक शुभेच्छा!
उत्सव रंगांचा पण रंगाचा बेरंग करू नका,
वृक्ष तोडून होळी साजरी करू नका,
नैसर्गिक रंगांचाच वापर करा,
प्राण्यांना रंग लावून त्रास देऊ नका,
रंगांनी भरलेले फुगे मारून
कोणाला ईजा करू नका.
होळीच्या हार्दिक शुभेच्छा!
नवयुग होळीचा संदेश नवा
झाडे लावा, झाडे जगवा,
करूया अग्निदेवतेची पूजा
होळी गोवऱ्यानी सजवा.