मातृभूमी ही अजिंक्य, विश्वात साऱ्या वंद्य संस्कृती,
कण कण मातीचा बोले हर्षे, विश्वास प्रेम इथे नांदती,
संपन्न इतिहास अन, युवकात प्रखर राष्ट्रप्रेम जागृती,
हर मनात हृदयात अन, हुंकार एकमेव जय भारती.
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
लहरतो आहे तिरंगा अभिमानाने
उंच आज या आकाशी,
उजळत ठेऊ सारे रंग त्याचे
घेऊ प्रण हा मुखाने.
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
या आपण नतमस्तक होऊ
ज्यांच्यामुळे हा दिवस आपण पाहतो आहे,
नशीबवान आहे हे रक्त
जे देशाच्या कामी आलं आहे.
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
स्वर्गाहुनी प्रिय आम्हाला अमुचा सुंदर देश,
आम्ही सारे एक, जरी नाना जाती नाना वेष.
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
असंख्यांनी केले सर्वस्व त्याग तुजसाठी
अनेकांनी केले बलिदान,
वंदन तयांसी करुनिया आज
गाऊ भारतमातेचे गुणगान.
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
वेगवेगळी माती जरीही एकच आहे भूमी,
हिंदू, मुस्लिम शीख नि ख्रिस्ती सारे एकच आम्ही.
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
स्वत:साठी स्वप्न सगळेच बघतात
देशासाठी आपण आज एक स्वप्न बघूया,
चला आपण आपला भारत
सुरक्षित आणि विकसित बनवूया.
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
विचारांचं स्वातंत्र्य, विश्वास शब्दांमध्ये, अभिमान आत्म्याचा.
चला या प्रजासत्ताक दिनी सलाम करूया आपल्या महान राष्ट्राला.
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
एकता ही भारताची सर्वात मोठी ताकद आहे.
एकत्र येऊनच आपण देशाला एक अधिक
मजबूत प्रजासत्ताक बनवू शकतो.
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
उंचच उंच फडकत राहो तिरंगा आपुला
कधीही फिका न पडो रंग त्यातला,
सर्वांनी मिळून राखूया त्याचा मान
सदैव राहो या तिरंग्याची शान.