तिरंगी आमचा भारतीय झेंडा, उंच उंच फडकवू,
प्राणपणाने लढून आम्ही शान याची वाढवू.
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
तनी - मनी बहरूदे नवा जोम
होऊ दे पुलकित रोम रोम,
घे तिरंगा हाती, नभी लहरु दे उंच जयघोष
मुखी जय भारत - जय हिंद गर्जु दे आसमंत.
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
उंचच उंच फडकत राहो तिरंगा आपुला
कधीही फिका न पडो रंग त्यातला,
सर्वांनी मिळून राखूया त्याचा मान
सदैव राहो या तिरंग्याची शान.
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
धर्माच्या नावावर जगू नका
धर्माच्या नावावर मरू नका,
मानवता हा देशाचा धर्म आहे
फक्त देशाच्या नावाने जगा.
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
मातृभूमी ही अजिंक्य, विश्वात साऱ्या वंद्य संस्कृती,
कण कण मातीचा बोले हर्षे, विश्वास प्रेम इथे नांदती,
संपन्न इतिहास अन, युवकात प्रखर राष्ट्रप्रेम जागृती,
हर मनात हृदयात अन, हुंकार एकमेव जय भारती.
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
रंग बलिदानाचा, रंग शांततेचा, रंग मातीच्या नात्याचा,
या स्वातंत्र्यासाठी अनेकांनी केला होता त्याग,
वंदन करुया तयांसी आज.
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
विचारांचं स्वातंत्र्य, विश्वास शब्दांमध्ये, अभिमान आत्म्याचा.
चला या प्रजासत्ताक दिनी सलाम करूया आपल्या महान राष्ट्राला.
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
या भारतमातेला कोटी कोटी वंदन करूया,
भारताला जगातील सर्व संपन्न राष्ट्र
बनविण्यासाठी कटिबध्द होऊया.
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
चला तिरंगा पुन्हा लहरूया,
आपल्या देशासाठी गाऊया,
आज आहे प्रजासत्ताक दिन,
चला आनंद साजरा करूया.
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
उंचच उंच फडकत राहो तिरंगा आपला
कधीही फिका न पडो रंग त्यातला,
सर्वांनी मिळून राखूया आपण त्याचा मान
सदैव राहो या तिरंग्याची शान.