या भारतमातेला कोटी वंदन करुया,
तिच्या रक्षणासाठी अगदी काहीही करुया.
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
स्वर्गाहुनी प्रिय आम्हाला अमुचा सुंदर देश,
आम्ही सारे एक, जरी नाना जाती नाना वेष.
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
चला आपल्या देशाच्या वीर जवानांना आठवूया,
त्यांनी दिलेल्या बलिदानाला आठवूया.
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
मातृभूमी ही अजिंक्य, विश्वात साऱ्या वंद्य संस्कृती,
कण कण मातीचा बोले हर्षे, विश्वास प्रेम इथे नांदती,
संपन्न इतिहास अन, युवकात प्रखर राष्ट्रप्रेम जागृती,
हर मनात हृदयात अन, हुंकार एकमेव जय भारती.
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
तीन रंग अपार प्रतिभेचे
नारंगी, पांढरा अन हिरवा,
रंगले न जाणे किती रक्ताने
तरी फडकतो नव्या उत्साहाने.
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
एकता ही भारताची सर्वात मोठी ताकद आहे.
एकत्र येऊनच आपण देशाला एक अधिक
मजबूत प्रजासत्ताक बनवू शकतो.
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
तिरंगा आता आकाशाला भिडेल,
भारताचे नाव प्रत्येकाच्या जिभेवर असेल,
त्याचा जीव घेईल किंवा आपला जीव देईल,
जो कोणी आपल्या भारतावर डोळा ठेवेल.
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
स्वत:साठी स्वप्न सगळेच बघतात
देशासाठी आपण आज एक स्वप्न बघूया,
चला आपण आपला भारत
सुरक्षित आणि विकसित बनवूया.
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
धर्माच्या नावावर जगू नका
धर्माच्या नावावर मरू नका,
मानवता हा देशाचा धर्म आहे
फक्त देशाच्या नावाने जगा.
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
वेगवेगळी माती जरीही एकच आहे भूमी,
हिंदू, मुस्लिम शीख नि ख्रिस्ती सारे एकच आम्ही.