लहरतो आहे तिरंगा अभिमानाने
उंच आज या आकाशी,
उजळत ठेऊ सारे रंग त्याचे
घेऊ प्रण हा मुखाने.
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
स्वातंत्र्यवीरांना करुया शतशः प्रणाम,
त्यांच्या निस्वार्थ त्यागानेच भारत बनला महान.
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
मातृभूमी ही अजिंक्य, विश्वात साऱ्या वंद्य संस्कृती,
कण कण मातीचा बोले हर्षे, विश्वास प्रेम इथे नांदती,
संपन्न इतिहास अन, युवकात प्रखर राष्ट्रप्रेम जागृती,
हर मनात हृदयात अन, हुंकार एकमेव जय भारती.
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
धर्माच्या नावावर जगू नका
धर्माच्या नावावर मरू नका,
मानवता हा देशाचा धर्म आहे
फक्त देशाच्या नावाने जगा.
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
स्वर्गाहुनी प्रिय आम्हाला अमुचा सुंदर देश,
आम्ही सारे एक, जरी नाना जाती नाना वेष.
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
सलाम करा या तिरंग्याला
जी तुमची शान आहे,
मान नेहमी ताठ ठेवा
जो पर्यंत प्राण आहे.
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
प्रजासत्ताक दिनी ठरवूया मनी,
देशासाठी करु काहीतरी.
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
धर्माच्या नावावर नाही, तर मानवतेच्या नावावर,
हाच आहे देशाचा धर्म, फक्त जगा देशाच्या नावावर.
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
तिरंगा आता आकाशाला भिडेल,
भारताचे नाव प्रत्येकाच्या जिभेवर असेल,
त्याचा जीव घेईल किंवा आपला जीव देईल,
जो कोणी आपल्या भारतावर डोळा ठेवेल.
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
चला करूया या,संविधानाचा आदर आज,
ज्याने दिला आपणास, जगण्याचा, शिकण्याचा अधिकार.