तीन रंग अपार प्रतिभेचे
नारंगी, पांढरा अन हिरवा,
रंगले न जाणे किती रक्ताने
तरी फडकतो नव्या उत्साहाने.
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
उंचच उंच फडकत राहो तिरंगा आपुला
कधीही फिका न पडो रंग त्यातला,
सर्वांनी मिळून राखूया त्याचा मान
सदैव राहो या तिरंग्याची शान.
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
भारत देश विविध रंगांचा,
विविध ढंगांचा, विविधता जपणा-या एकात्मतेचा.
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
नका विचारू दुनियेला आमची कहाणी काय आहे,
आम्ही फक्त हिंदुस्थानी, एवढीच आमची ओळख आहे.
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
मातृभूमी ही अजिंक्य, विश्वात साऱ्या वंद्य संस्कृती,
कण कण मातीचा बोले हर्षे, विश्वास प्रेम इथे नांदती,
संपन्न इतिहास अन, युवकात प्रखर राष्ट्रप्रेम जागृती,
हर मनात हृदयात अन, हुंकार एकमेव जय भारती.
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
सलामी या तिरंग्याला,
ज्याच्यामुळे आपली शान आहे,
मान याची नेहमी ऊंच ठेवू,
जोपर्यंत जीवात जीव आहे.
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
या भारतमातेला कोटी वंदन करुया,
तिच्या रक्षणासाठी अगदी काहीही करुया.
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
एकता ही भारताची सर्वात मोठी ताकद आहे.
एकत्र येऊनच आपण देशाला एक अधिक
मजबूत प्रजासत्ताक बनवू शकतो.
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
झेंडा आमुचा प्रिया देशाचा
फडकतो वरी महान,
करितो आम्ही प्रणाम याला
करितो आम्ही प्रणाम.
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
तिरंगा आता आकाशाला भिडेल,
भारताचे नाव प्रत्येकाच्या जिभेवर असेल,
त्याचा जीव घेईल किंवा आपला जीव देईल,
जो कोणी आपल्या भारतावर डोळा ठेवेल.