या भारतमातेला कोटी कोटी वंदन करूया,
भारताला जगातील सर्व संपन्न राष्ट्र
बनविण्यासाठी कटिबध्द होऊया.
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
सलामी या तिरंग्याला,
ज्याच्यामुळे आपली शान आहे,
मान याची नेहमी ऊंच ठेवू,
जोपर्यंत जीवात जीव आहे.
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
झेंडा आमुचा प्रिया देशाचा
फडकतो वरी महान,
करितो आम्ही प्रणाम याला
करितो आम्ही प्रणाम.
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
भारत देश विविध रंगांचा,
विविध ढंगांचा, विविधता जपणा-या एकात्मतेचा.
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
भारतीय असण्याचा करू या गर्व,
सोबत मिळून करू साजरे प्रजासत्ताक चे पर्व,
देशाच्या शत्रूंना मिळून हरवू,
घराघरावर चला आपला तिरंगा लहरवू.
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
तिरंगा आता आकाशाला भिडेल,
भारताचे नाव प्रत्येकाच्या जिभेवर असेल,
त्याचा जीव घेईल किंवा आपला जीव देईल,
जो कोणी आपल्या भारतावर डोळा ठेवेल.
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
धर्माच्या नावावर जगू नका
धर्माच्या नावावर मरू नका,
मानवता हा देशाचा धर्म आहे
फक्त देशाच्या नावाने जगा.
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
धर्माच्या नावावर नाही, तर मानवतेच्या नावावर,
हाच आहे देशाचा धर्म, फक्त जगा देशाच्या नावावर.
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
असंख्यांनी केले सर्वस्व त्याग
तुझ्यासाठी अनेकांनी केले बलिदान,
वंदन तयांसी करुनिया आज
गाऊ भारतमाताचे गुणगान.
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
मातृभूमी ही अजिंक्य, विश्वात साऱ्या वंद्य संस्कृती,
कण कण मातीचा बोले हर्षे, विश्वास प्रेम इथे नांदती,
संपन्न इतिहास अन, युवकात प्रखर राष्ट्रप्रेम जागृती,
हर मनात हृदयात अन, हुंकार एकमेव जय भारती.