या भारतमातेला कोटी कोटी वंदन करूया,
भारताला जगातील सर्व संपन्न राष्ट्र
बनविण्यासाठी कटिबध्द होऊया.
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
भारतीय असण्याचा करू या गर्व,
सोबत मिळून करू साजरे प्रजासत्ताक चे पर्व,
देशाच्या शत्रूंना मिळून हरवू,
घराघरावर चला आपला तिरंगा लहरवू.
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
भारत देश विविध रंगांचा,
विविध ढंगांचा, विविधता जपणा-या एकात्मतेचा.
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
मुक्त आमुचे आकाश सारे
झुलती हिरवी राने वने,
स्वैर उडती पक्षी नभी
आनंद आज उरी नांदे.
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
मातृभूमी ही अजिंक्य, विश्वात साऱ्या वंद्य संस्कृती,
कण कण मातीचा बोले हर्षे, विश्वास प्रेम इथे नांदती,
संपन्न इतिहास अन, युवकात प्रखर राष्ट्रप्रेम जागृती,
हर मनात हृदयात अन, हुंकार एकमेव जय भारती.
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
ना हिंदू, ना मुसलमान फक्त माणूस बना,
आपण सारे मिळून मानवता हाच धर्म माना.
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
धर्माच्या नावावर जगू नका
धर्माच्या नावावर मरू नका,
मानवता हा देशाचा धर्म आहे
फक्त देशाच्या नावाने जगा.
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
ना माझे कोणते सरकार नाही
माझे कोणतेही मोठे नाव नाही,
मला छोट्याशा गोष्टीचा अभिमान आहे
मी भारतीय आहे आणि भारत माझा देश आहे.
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
उंचच उंच फडकत राहो तिरंगा आपला
कधीही फिका न पडो रंग त्यातला,
सर्वांनी मिळून राखूया आपण त्याचा मान
सदैव राहो या तिरंग्याची शान.
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
रंग बलिदानाचा, रंग शांततेचा, रंग मातीच्या नात्याचा,
या स्वातंत्र्यासाठी अनेकांनी केला होता त्याग,
वंदन करुया तयांसी आज.