सर्व स्वप्न घेऊन मनामध्ये,
चला पतंग उडवू या आकाशामध्ये,
माझा पतंग घेईल अशी ही उडान,
जो जीवनात भरेल रंग खूपच छान.
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!
नभी उंचच उंच लहरू दे पतंग,
आयुष्यात बहरू दे एक नवी उमंग,
आणि आयुष्यात पसरू दे आनंद तरंग.
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!
नाते तुमचे आमचे हळुवार जपायचे,
तिळगुळ हलव्यासंगे अधिक दॄढ करायचे.
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!
साजरे करु मकर संक्रमण
करून संकटावर मात,
हास्याचे हलवे फुटुन
तिळगुळांची करु खैरात.
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!
तिळगुळाच्या गोडव्याची मिठास,
घेऊन आला मकरसंक्रांतीचा सण हा खास.
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!
गगनात उंच उडता पतंग
संथ हवेची त्याला साथ,
मैत्रीचा हा नाजूक बंध
नाते आपुले राहो अखंड.
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!
मोठे ध्येय ठेऊन मनात,
उडवूया पतंग उंच गगनात,
असे उंच जातील आपले पतंग,
जे देतील जीवनास आनंद तरंग.
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!
संक्रांतीची भेटकार्ड, हलव्याचे चार दाणे,
प्रेम व्यक्त करायची आजकालची साधने,
तुम्हा आम्हा सर्वांनी प्रेम ऐसे व्यक्त व्हावे,
प्रेमाच्या त्या बहराने जीवनात सुखी व्हावे.