तिळात मिसळला गुळ, त्याचा केला लाडु,
मधुर नात्यासाठी गोड गोड बोलु.
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!
मनात असते आपुलकी
म्हणून स्वर होतो ओला,
मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा
तिळगुळ घ्या, गोड गोड बोला.
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!
शुभ्र गोड हलवा, त्याला रंग केशराचा,
स्पर्शातच फुलवी काटा, हात कौतुकाचा,
अर्पिला तुम्हाला हलवा, गोड करून घ्यावा,
गोड गोड शब्दासंगे स्नेहभाव द्यावा.
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!
मोठे ध्येय ठेऊन मनात,
उडवूया पतंग उंच गगनात,
असे उंच जातील आपले पतंग,
जे देतील जीवनास आनंद तरंग.
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!
संक्रांतीची भेटकार्ड, हलव्याचे चार दाणे,
प्रेम व्यक्त करायची आजकालची साधने,
तुम्हा आम्हा सर्वांनी प्रेम ऐसे व्यक्त व्हावे,
प्रेमाच्या त्या बहराने जीवनात सुखी व्हावे.
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!
साजरे करु मकर संक्रमण
करून संकटावर मात,
हास्याचे हलवे फुटुन
तिळगुळांची करु खैरात.