दुःख सारे विसरून जाऊ
गोड गोड बोलून आनंदाने राहू,
नवीन उत्सवाचे स्वागत करू चला
तिळगुळ घेऊन गोडगोड बोला.
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!
नवीन वर्षाच्या नवीन सणाच्या,
गोड मित्रांना मकर संक्रातीच्या,
गोड गोड शुभेच्छा.
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!
शुभ्र गोड हलवा, त्याला रंग केशराचा,
स्पर्शातच फुलवी काटा, हात कौतुकाचा,
अर्पिला तुम्हाला हलवा, गोड करून घ्यावा,
गोड गोड शब्दासंगे स्नेहभाव द्यावा.
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!
बंधनापलीकडे एक नाते असावे
शब्दाचे बंधन त्याला नसावे,
भावनांचा आधार असावा
दुःखाला तिथे थारा नसावा,
असा गोडवा आपल्या मैत्रित असावा.
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!
संक्रांतीची भेटकार्ड, हलव्याचे चार दाणे,
प्रेम व्यक्त करायची आजकालची साधने,
तुम्हा आम्हा सर्वांनी प्रेम ऐसे व्यक्त व्हावे,
प्रेमाच्या त्या बहराने जीवनात सुखी व्हावे.
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!
गोडवा मधुर वाणीचा, रंग उडत्या पतंगाचा,
बंध दाटत्या नात्यांचा, सण आला संक्रांतीचा.
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!
नाते तुमचे आमचे हळुवार जपायचे,
तिळगुळ हलव्यासंगे अधिक दॄढ करायचे.