हलव्याचे दागिने, काळी साडी,
अखंड राहो तुमची जोडी
हीच शुभेच्छा, संक्रांत वर्ष दिनी.
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!
दुःख असावे तिळासारखे,
आनंद असावा गुळासारखा,
जीवन असावे तिळगुळासारखे.
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!
संक्रांतीची भेटकार्ड, हलव्याचे चार दाणे,
प्रेम व्यक्त करायची आजकालची साधने,
तुम्हा आम्हा सर्वांनी प्रेम ऐसे व्यक्त व्हावे,
प्रेमाच्या त्या बहराने जीवनात सुखी व्हावे.
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!
संक्रांतीचा सुदिन मंगल आज आला,
मी हा स्वत:च तीळगुळ सुरेख केला,
या शुभ्रतेत भरला मधुन ची रंग,
घ्या चाखुनी, हृदयी प्रेम असो अभंग.
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!
शब्द रुपी तिळगूळ घ्या
गोड बोलतच आहात तसेच बोलत रहा,
मकर संक्रांत हा एक गोड सण आहे
तुम्हाला शुभेच्छा देण्याचे एक निमित्त आहे.
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!
एक तिळ रुसला, फुगला
रडत रडत गुळाच्या पाकात पडला,
खुदकन हसला हातावर येताच बोलू लागला
तिळगुळ घ्या गोड गोड बोला.
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!
विसरूनी सर्व कटुता हृदयात
तिळगुळाचा गोडवा यावा,
दुःखे हरावी सारी आणि
आयुष्य सुखाचा सोहळा व्हावा.
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!
नभी उंचच उंच लहरू दे पतंग,
आयुष्यात बहरू दे एक नवी उमंग,
आणि आयुष्यात पसरू दे आनंद तरंग.
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!
साजरे करु मकर संक्रमण
करून संकटावर मात,
हास्याचे हलवे फुटुन
तिळगुळांची करु खैरात.
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!
वर्ष सरले डिसेंबर गेला,
हर्ष घेऊनी जानेवारी आला,
निसर्ग सारा दवाने ओला,
तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला.