तिळ आम्ही आहोत, तर गुळ तुम्ही,
मिष्टान्न आम्ही आहोत, तर त्यातील गोडवा तुम्ही,
वर्षाच्या पहिल्या सणापासून होत आहे सुरवात,
आमच्याकडून तुम्हास हॅप्पी मकर संक्रांत.
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!
विसरूनी सर्व कटुता हृदयात
तिळगुळाचा गोडवा यावा,
दुःखे हरावी सारी आणि
आयुष्य सुखाचा सोहळा व्हावा.
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!
एक तिळ रुसला, फुगला
रडत रडत गुळाच्या पाकात पडला,
खुदकन हसला हातावर येताच बोलू लागला
तिळगुळ घ्या गोड गोड बोला.
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!
नभी उंचच उंच लहरू दे पतंग,
आयुष्यात बहरू दे एक नवी उमंग,
आणि आयुष्यात पसरू दे आनंद तरंग.
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!
साजरे करु मकर संक्रमण
करून संकटावर मात,
हास्याचे हलवे फुटुन
तिळगुळांची करु खैरात.
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!
मोठे ध्येय ठेऊन मनात,
उडवूया पतंग उंच गगनात,
असे उंच जातील आपले पतंग,
जे देतील जीवनास आनंद तरंग.
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!
वर्ष सरले डिसेंबर गेला,
हर्ष घेऊनी जानेवारी आला,
निसर्ग सारा दवाने ओला,
तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला.