मराठी अस्मिता, मराठी मन
मराठी परंपरेची मराठी शान,
संक्रांतीचा सण घेऊन आला
नवचैतन्याची खाण.
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!
गोडवा मधुर वाणीचा, रंग उडत्या पतंगाचा,
बंध दाटत्या नात्यांचा, सण आला संक्रांतीचा.
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!
विसरुनी जा दुःख तुझे हे
मनालाही दे तू विसावा,
आयुष्याचा पतंग तुझा हा
प्रत्येक क्षणी गगनी भिडावा.
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!
घालशील जेव्हा तू काळी साडी,
लाभेल तुला तिळगुळाची गोडी,
माझ्या हातात दे पतंगाची दोरी,
करूया साजरी शुभ मकर संक्रांती.
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!
तिळ आम्ही आहोत, तर गुळ तुम्ही,
मिष्टान्न आम्ही आहोत, तर त्यातील गोडवा तुम्ही,
वर्षाच्या पहिल्या सणापासून होत आहे सुरवात,
आमच्याकडून तुम्हास हॅप्पी मकर संक्रांत.
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!
गगनात उंच उडता पतंग
संथ हवेची त्याला साथ,
मैत्रीचा हा नाजूक बंध
नाते आपुले राहो अखंड.
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!
शुभ्र गोड हलवा, त्याला रंग केशराचा,
स्पर्शातच फुलवी काटा, हात कौतुकाचा,
अर्पिला तुम्हाला हलवा, गोड करून घ्यावा,
गोड गोड शब्दासंगे स्नेहभाव द्यावा.
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!
तिळगुळाच्या गोडव्याची मिठास,
घेऊन आला मकरसंक्रांतीचा सण हा खास.