दुःख असावे तिळासारखे,
आनंद असावा गुळासारखा,
जीवन असावे तिळगुळासारखे.
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!
गुळातील गोडवा ओठावर येऊ द्या,
मनातील कडवापणा बाहेर पडू द्या,
या संक्रांतीला तीळगुळ खाताना
आमची आठवण राहू द्या.
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!
साजरे करु मकर संक्रमण
करून संकटावर मात,
हास्याचे हलवे फुटुन
तिळगुळांची करु खैरात.
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!
हलव्याचे दागिने, काळी साडी,
अखंड राहो तुमची जोडी
हीच शुभेच्छा, संक्रांत वर्ष दिनी.
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!
नवीन वर्षाच्या नवीन सणाच्या,
गोड मित्रांना मकर संक्रातीच्या,
गोड गोड शुभेच्छा.
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!
गगनात उंच उडता पतंग
संथ हवेची त्याला साथ,
मैत्रीचा हा नाजूक बंध
नाते आपुले राहो अखंड.
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!
मोठे ध्येय ठेऊन मनात,
उडवूया पतंग उंच गगनात,
असे उंच जातील आपले पतंग,
जे देतील जीवनास आनंद तरंग.
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!
विसरूनी सर्व कटुता हृदयात
तिळगुळाचा गोडवा यावा,
दुःखे हरावी सारी आणि
आयुष्य सुखाचा सोहळा व्हावा.
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!
तिळ आम्ही आहोत, तर गुळ तुम्ही,
मिष्टान्न आम्ही आहोत, तर त्यातील गोडवा तुम्ही,
वर्षाच्या पहिल्या सणापासून होत आहे सुरवात,
आमच्याकडून तुम्हास हॅप्पी मकर संक्रांत.
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!
सूर्याने बदलली आपली राशी,
गंगा स्नान करून आले सर्व मनुष्यवासी,
पतंगांचा जल्लोष घेऊन आला आनंदाचा सण,
आपल्याला शुभेच्छा देताना प्रफुल्लित झाले माझे मन.