Happy New Year Wishes In Marathi - नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
Share :
एक पान गळून पडलं
तरच दुसरं जन्माला येणार,
एक वर्ष संपलं तरच
नवीन वर्ष पहायला मिळणार.
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
मना मनातून आज उजळले
आनंदाचे लक्ष दिवे,
समृध्दीच्या या नजरांना
घेऊन आले वर्ष नवे.
नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
सुख दुःख सहन करत
मात दिली त्या गत वर्षा,
मनामनातील भावनांनी
स्वागत करू या नववर्षा.
नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
पुन्हा एक नवीन वर्ष, पुन्हा एक नवी आशा,
तुमच्या कर्तृत्वाला, पुन्हा एक नवी दिशा.
नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
येवो समृद्धि अंगणी
वाढो आनंद जीवनी,
तुम्हासाठी या शुभेच्छा
नव वर्षाच्या या शुभदिनी.
नववर्षाभिनंदन!
हे नातं सदैव असंच राहो,
मनात आठवणींचे दीप कायम राहो,
खूप प्रेमळ होता २०२२ चा प्रवास,
अशीच राहो २०२३ मध्येही आपली साथ.
नववर्षाभिनंदन!
पूर्ण होवोत तुमचे सगळे Aim,
सदैव वाढत राहो तुमचं Fame,
मिळत राहो प्रेम आणि दोस्ती,
मिळो लॉट ऑफ फन आणि मस्ती.
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
या नवीन वर्षासाठी माझी ही एकच इच्छा आहे,
मला तुझ्यावर पूर्वीपेक्षा जास्त प्रेम करता यावे,
तुझी पूर्वीपेक्षा जास्त काळजी घेता यावी,
आणि पूर्वीपेक्षा तुला अधिक सुख देता यावे.
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
चला सारेजण गतवर्षाची गोळाबेरीज करूया,
चांगले तेवढे जवळ ठेऊन वाईट वजा करूया,
नवे संकल्प, नव्या आशा पुन्हा पल्लवित करूया.
नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
पाहता दिवस उडुन जातील,
तुझ्या कर्तृत्वाने दिशा झळकुन जातील,
आशा मागील दिवसांची करु नको,
पुढील दिवस तुझे सोन्याने न्हाऊन निघतील.
जे जे हवे तुम्हाला ते ते मिळू दे,
भाग्यवान या शब्दाचा अर्थ तुमच्याकडे पाहुन कळु दे,
शिखरे यशाची सर तुम्ही करावी,
पाहता वळूनि मागे शुभेच्छा माझी स्मरावी,
तुमच्या आनंदाचा वेल गगनाला भिडू दे,
आयुष्यात तुमच्या सर्व काही मनासारखे घडू दे.
नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
नव्या कल्पना, नव्या भराऱ्या
झेप घेऊया क्षितिजावर,
उंच उंच ध्येयाची शिखरे
गगनाला घालूया गवसणी,
हाती येतील सुंदर तारे
नववर्षाच्या सुरवातीला मनासारखे घडेल सारे.
नववर्षाभिनंदन!
दुःख सारी विसरून जावू
सुख देवाच्या चरणी वाहू,
स्वप्ने उरलेली, नव्या या वर्षी
नव्या नजरेने नव्याने पाहू.
नववर्षाभिनंदन!
पाकळी पाकळी भिजावी
अलवार त्या दवाने,
फुलांचेही व्हावे गाणे
असे जावो वर्ष नवे.
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
नव्या या वर्षी
संस्कृती आपली जपूया,
थोरांच्या चरणी एकदा तरी
मस्तक आपले झुकवूया.
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
पुन्हा एक नविन वर्ष, पुन्हा एक नवी आशा,
तुमच्या कर्तॄत्वाला पुन्हा एक नवी दिशा,
नवी स्वप्ने, नवी क्षितीजे, सोबत माझ्या नव्या शुभेच्छा!
नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
चला या नवीन वर्षाचं स्वागत करूया,
जुन्या स्वप्नांना, नव्याने फुलवुया.
नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
गेलं ते वर्ष आणि गेला तो काल,
आता नवीन आशा अपेक्षा घेवून आले २०२३ साल.
नववर्षाभिनंदन!
गतवर्षीच्या फुलाच्या पाकळ्या वेचून घे
भिजलेली आसवे झेलून घे
सुख दुःख झोळीत साठवून घे
आता उधळ हे सारे आकाशी
नववर्षाचा आनंद भरभरून घे.
नववर्षाभिनंदन!
नवीन वर्षात पदार्पण करताना
खूप मोठे ध्येय पार करायचे आहे,
आपणा सर्वांना सोबत घेऊन
काहीतरी नवीन करायचे आहे.
नववर्षाभिनंदन!
वाघ कधी लपून शिकार नाही करत,
घाबरट लोकं समोरून वार नाही करत,
आम्ही ते आहोत जे नवीन वर्षाचं विश करण्यासाठी,
एक जानेवारीची वाट नाही बघत.
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
कोणतंही दुःख कोणतीही उदासी,
कोणाचंही मन दुखू नये हे नववर्ष,
सगळ्यांसाठी घेऊन येऊ भरभरून सुख,
हीच माझी इच्छा आहे मनापासून खूप.
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
सरत्या वर्षात झालेल्या चुका
विसरून जाण्याचा प्रयत्न करूया,
नवीन वर्षात नवे संकल्प करूया.